पोन्टिंग स्वत:हून संघाबाहेर राहिला
सहाव्या आयपीएल ट्वेंटी-20 साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रिकी पोन्टिंग याने स्वत:हून संघाबाहेर राहणे पसंत केले. असे प्रभारी कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले. रिकी हा धावा जमविण्यासाठी संघर्ष करीत आहे. कोलकाता संघाविरुध्दच महत्त्वाच्या सामन्यासाठी आम्हाला परदेशी खेळाडूंचे योग्य संतुलन हवे होते. त्यामुळे त्याने स्वत:च विश्रंती घेणे पसंत केले. तो संघाबाहेर राहिल्यामुळे मिसल जॉन्सन खेळू शकला. पोन्टिंगने पाच सामन्यात फक्त 52 धावा केल आहेत. मुंबईने हा सामना जिंकला असला तरी महत्त्वाच्या क्षणी बाद झाल्याबद्दल रोहितने निराशा व्यक्त केली.