शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 9 एप्रिल 2018 (17:13 IST)

आयपीएलसाठी बीएसएनएलची ऑफर, अवघ्या ५ रुपयांत प्लान

बीएसएनएलने ग्राहकांसाठी आयपीएलनिमित्त एक ऑफर आणली आहे. बीएसएनएलच्या ऑफरनुसार ग्राहकांना अवघ्या ५ रुपयांत आयपीएलचा सामना लाईव्ह पाहता येणार आहे. बीएसएनएलने ५१ दिवसांसाठी २४८ रुपयांचा प्लान सुरू केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज ३ जीबीनुसार एकूण १५३ जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. कंपनीने सांगितले की, या प्लानसोबत युजर्सना आयपीएलचे सगळे सामने लाईव्ह पाहता येणार आहेत. ही ऑफर ३० एप्रिलपर्यंत रिचार्ज करता येणार आहे. जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने आपला नवीन प्लान सुरू केला आहे.
 
आयपीएल- २०१८ला ७ एप्रिलपासून सुरुवात झाली असून २७ पर्यंत आयपीएलचा धमाका सुरू राहणार आहे. जिओच्या ग्राहकांसाठी क्रिकेट सीजन पॅकसोबत जिओने नवीन लाईव्ह मोबाईल गेमही सुरू केला आहे. सात आठवड्यांसाठी ११ भाषांमध्ये या गेमची मजा घेता येणार आहे. जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना ४जी स्पीड मिळणार आहे. यासोबतच एअरटेलनेही आयपीएलचे लाईव्ह सामने दाखवण्याची सोय केलेली आहे. यासाठी एअरटेलने हॉटस्टारशी करार केला आहे.