गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (11:32 IST)

YouTube वर फ्रीमध्ये बघू शकाल चित्रपट, नवीन फीचरची सुरुवात

आतापर्यंत तुम्हाला यूट्यूबवर पूर्ण चित्रपट बघण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. दोन ऑप्शन मिळतात, या तर तुम्ही चित्रपट रेन्टवर बघू शकता किंवा त्याला विकत घेऊ शकता. पण काही चित्रपट तुम्ही फ्री देखील बघू शकता.
 
YouTube मध्ये आता बदल येऊ लागला आहे आणि कंपनी नवीन फीचर आणत आहे ज्यात यूजर्स यूट्यूबवर फ्रीमध्ये चित्रपट बघू शकतील.
 
रिपोर्टनुसार एक नवीन फीचर येत आहे ज्याला फ्री टु वॉच म्हणू. यात यूजर्स फ्रीमध्ये यूट्यूबवर चित्रपट बघू शकतो. पण फ्री चित्रपटांमध्ये जाहिरात दाखवण्यात येतील. अद्याप गूगलने हे स्पष्ट नाही केले आहे की एका चित्रपटात किती जाहिराती असतील आणि त्यांची फ्रिक्वेंसी काय असेल.
 
द वर्जच्या रिपोर्टनुसार यूट्यूबवर फ्री मिळणार्‍या चित्रपटांमध्ये पॉप एड्स दिसतील जे चित्रपटाच्या दरम्यान सतत काही काही वेळेने दिसत राहतील. या फीचरला कंपनीने ऑक्टोबरमध्येच सुरू केले होते, पण हे मागील आठवड्यापासून दाखवण्यात येत आहे.
 
कॅलिफोर्निया बेस्ड कंपनीने हॉलिवूड स्टुडियोजसोबत पार्टनरशिप केली आहे. या लिस्टमध्ये 100 चित्रपट आहे. येणार्‍या काळात अजून चित्रपट सामील करण्यात येतील. यात द टर्मिनेटर, हॅकर्स, सेव्ड आणि रॉकी सिरींजचे चित्रपट सामील आहे. या लिस्टमध्ये बॉलीवूडचे चित्रपट नाही आहे, पण येणार्‍या वेळेस बॉलीवूडचे चित्रपट देखील येऊ शकतात. कंपनीने अद्याप याबद्दल काही बयान दिलेले नाही.
 
यूट्यूब प्रॉडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर रोहित धवन ने AdAge ला सांगितले आहे की कंपनी हा नवीन फीचर्स एडवर्टाइजर्स आणि यूजर्स दोघांच्या डिमांड आणि हिताबद्दल बघून आणत आहे. हे दोघांसाठी फायदेशीर आहे. यूजर्सला फ्रीमध्ये चित्रपट बघायला मिळतील आणि विज्ञापनकर्तांना विज्ञापन करण्याचा मोका मिळेल.