रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (16:20 IST)

जगातील इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद होणार

जगभरामध्ये इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या मुख्य सर्व्हर्सच्या देखभालीचे काम हाती घेण्यात आल्याने ही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. वार्षिक देखभालीच्या कामासाठी इंटरनेट सेवा पुरवणारे मुख्य सर्व्हर्स काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स अॅण्ड नंबर्स (आयसीएएनएन) मार्फत सर्व्हर देखभालीचे महत्वाचे काम केले जाणार आहे. जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या महत्वाचे सर्व्हसमध्ये काही महत्वाचे तांत्रिक बदल करायचे आहेत. या डागडुजीमध्ये ‘क्रिटोग्राफिक की’ म्हणजे ज्यामध्ये जगभरातील वेबसाईट्सचे डोमेन नेम्स (वेबसाईट्सची नावे) साठवून ठेवलेली असतात त्या ‘की’मध्ये बदल करण्यात येणार आहे.