शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:26 IST)

Valentines Day: रिलायन्स JIO ची खास ऑफर

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खासकरून व्हॅलेंटाईन डे आठवड्याच्या निमित्ताने अनेक विशेष प्रीपेड रिचार्ज ऑफर जाहीर केल्या आहेत. विशेष प्रीपेड रिचार्ज अंतर्गत, ग्राहकांना अतिरिक्त डेटा, फ्लाइट बुकिंग आणि मोफत कूपन यांसारखे फायदे मिळणार आहेत. व्हॅलेंटाईन डे स्पेशल प्रीपेड ऑफर अंतर्गत, ग्राहक 14 फेब्रुवारीपर्यंत रिचार्ज करून विशेष ऑफरचा लाभ घेऊ शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की या ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत आणि जिओने आत्तापर्यंत एक्सपायरी डेट जाहीर केलेली नाही. हे विशेष प्रीपेड रिचार्ज MyJio अॅपच्या मदतीने केले जाऊ शकतात.
 
व्हॅलेंटाईन डे स्पेशल प्रीपेड रिचार्ज
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी टेल्कोने अद्याप अंतिम तारीख ठरवलेली नाही. म्हणजेच, वापरकर्ते 14 फेब्रुवारीनंतरही (ऑफर बंद होण्यापूर्वी) याचा लाभ घेऊ शकतील. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना व्हॅलेंटाईन डेचा लाभ 349 रुपये, 899 रुपये आणि 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर उपलब्ध असेल.
 
इतर फायदे देखील जाणून घ्या
कंपनीच्या घोषणेनुसार, 10 फेब्रुवारी रोजी किंवा त्यानंतर रिचार्ज पूर्ण करणार्‍या सर्व नोंदणीकृत Jio ग्राहकांना व्हॅलेंटाईन डे स्पेशल प्रीपेड रिचार्ज अंतर्गत काही अतिरिक्त फायदे दिले जातील. वापरकर्त्यांना एकूण चार प्रकारे फायदे मिळतील. MyJio अॅपच्या मदतीने 349 रुपये, 899 रुपये आणि 2999 रुपयांचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त 12 GB 4G डेटाचा लाभ मिळेल, जो ते 30 दिवसांच्या आत कधीही रिडीम करू शकतात.
 
याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना Ixigo ऑफर अंतर्गत फ्लाइट बुकिंगवर 750 रुपये सूट मिळेल. विशेष प्रीपेड रिचार्ज अंतर्गत, वापरकर्त्यांना Rs.799 च्या खरेदीवर Ferns & Petals वर Rs.150 सूट मिळेल आणि McDonald's Burgers वर Rs.05 डिस्काउंट कूपन किमान Rs.199 च्या ऑर्डरवर मिळेल.
 
कूपन येथे पाहिले जाऊ शकतात
कंपनीच्या म्हणण्यानुसार, सर्व कूपन MyJio अॅपद्वारे रिडीम केले जातील आणि रिचार्ज प्रक्रियेनंतर 72 तासांनंतर व्हाउचर उपलब्ध होतील. कूपन 30 दिवसांसाठी रिडीम करण्यासाठी वैध असतील. वाचकांनी रिचार्ज करण्यापूर्वी त्यांच्या नंबरवर उपलब्ध ऑफर तपासण्याचा सल्ला दिला जातो.
Edited by : Smita Joshi