गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2020 (22:17 IST)

गप्पा मारण्यासाठी व्हॉटस् अ‍ॅपचे शानदार फिचर

लॉकडाऊनमध्ये गप्पा मारण्यासाठी  व्हॉटस् अ‍ॅपने एक शानदार फिचर आणले आहे. आता आपण घरबसल्याच एकाच नव्हे तर अनेक लोकांशी एकाचवेळी गप्पागोष्टी करू शकता. केवळ गप्पांसाठीच नव्हे तर ऑफिसचे व्हिडीओ कॉलही या माध्यमातून करता येतील. 
 
फेसबुकच्या अंतर्गत काम करणार्‍या ‘व्हॉटस् अ‍ॅप’ने घोषणा केली आहे की आता कोणताही यूजर आपल्या एखाद्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपमधील लोकांशी व्हिडीओ चॅट करू शकतो. अर्थात एकावेळी केवळ चारजणच स्क्रीनवर दिसू शकतात; पण हा व्हिडीओ चॅट संपूर्ण ग्रुप ऐकू शकेल. याबाबत कंपनीने एक ट्विटही केले आहे. कंपनीने म्हटले आहे की आपण आपल्या कोणत्याही व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपमध्ये जाऊन तेथील व्हिडीओचा आयकॉन प्रेस करा. त्यानंतर ग्रुपच्या सर्व लोकांजवळ नोटिफिकेशन जाईल. त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही तीन सदस्यांना निवडा ज्यांना आपण स्क्रिनवर पाहू इच्छिता. अर्थात त्यावेळी आपले सर्व बोलणे ग्रुपमधील अन्य सदस्यही ऐकू शकतात.