रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (14:55 IST)

Delhi Metro Video : दिल्लीच्या मेट्रोत स्टंट करताना घडलं हे

Delhi Metro
social media
दिल्लीच्या मेट्रोचे दररोज अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. मेट्रोत प्रपोज करतात. गाणे म्हणतात, डान्स करतात, योगा देखील करतात. अलीकडेच नागपुरात मेट्रोमध्ये चक्क फॅशन वॉक करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता आज दिल्लीच्या मेट्रोतील व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओ मध्ये एक मुलगा स्टंट करायला गेला आणि त्याचा डाव फिसकटला. 

व्हिडीओ मध्ये एक मुलगा बॅक फ्लिप करायला जातो आणि त्याचा अंदाज चुकतो आणि तो थेट डोक्यावर आदळतो. हा व्हिडीओ chaman_flipper नावाच्या अकाउंट वरून शेअर केला आहे. 
 
या व्हिडीओला 1 लाख हुन अधिक लोकांनी बघितला आहे. युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit