शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

Video दारूच्या नशेत साइनबोर्डवर पुशअप्स

आपल्या सर्वांना माहित आहे की दारूच्या नशेत लोक त्यांच्या संवेदना गमावतात. दारु प्यायल्यावर स्वतःच्या मनावर नियंत्रण नसते. मग नशेच्या अवस्थेत कुणी कितीही सांगितलं तरी त्यांना अजिबात कळत नाही. कारण मद्यधुंद अवस्थेत माणूस जे काही करतो त्याचं त्यावर नियंत्रण नसतं.
 
दारूच्या नशेत अनके चाळे करत असलेले व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील मात्र आता असा एक नवीन व्हिडिओ बघायला मिळत आहे ज्यात एक व्यक्ती साइनबोर्डच्या वर पुश-अप करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांनुसार ही व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे बोलले जात आहे.
 
इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ ओडिशातील संबलपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी आम्ही हा व्हिडिओ कुठला आणि केव्हाचा आहे याची पुष्टी करत नाही. यामध्ये तुम्हाला एक मद्यधुंद व्यक्ती उंच साईनबोर्डवर पुश-अप करताना दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, तसतसे वाहने साइनबोर्डच्या खालीतून जाताना आणि त्या माणसावर ओरडताना दिसतात.
 
हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला असून या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. लोकांना त्या व्यक्तीची खूप काळजी वाटत होती आणि त्यांनी सांगितले की, असा उपद्रव करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे.