बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 जुलै 2018 (08:36 IST)

फेसबुकने आत्महत्येपासून परावृत्त केले

आसाममधील एका अल्पवयीन मुलीने आपण आत्महत्या करणार असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली होती. फेसबुकने याबाबतचा अलर्ट अमेरिकेतील मुख्यालयात पाठवला. तेथून तातडीने सूत्रे हलवून गुवाहाटी पोलिसांना अमेरिकेच्या फेसबुकच्या मुख्यालयातून याबाबत माहिती देण्यात आली.‘तुमच्या परिसरात एक अल्पवयीन मुलगी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे’तिने याबाबत तिच्या फेसबुकवर पोस्ट टाकल्याचे मुख्यालयातून आलेल्या अलर्टमध्ये म्हटले होते. गुवाहाटी पोलिसांनी तातडीने पावले उचलून ३० मिनिटांमध्ये मुलीचा पत्ता शोधला. तिच्या घरी जाऊन तिचे समुपदेश केले आणि आत्महत्येच्या विचारापासून तिला परावृत्त केले.
 
आपण परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे अल्पवयीन मुलीने फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते. फेसबुकने या पोस्टची दखल घेत ती मुख्यालयाकडे पाठवली. तेथेही या पोस्टचे गांभीर्य ओळखून त्याबाबत गुवाहाटी पोलिसांना अलर्ट पाठवण्यात आले. पोलिसांनी तातडीने पावले उचलत त्या मुलीला आत्महत्येपासून परावृत्त करून तिचा जीव वाचवला आहे. आता त्या मुलीची मानसीक स्थिती सुधारत असून ती सुरक्षीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या समुपदेशनानंतर मुलीने आत्महत्येबाबतची पोस्ट डिलीट केली आहे.