गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 19 मे 2018 (15:18 IST)

अधीक्षक अभियंता म्हणतो, मी श्रीविष्णूंचा अवतार

गुजरातमधील एका अधिकाऱ्याला तो साक्षात श्रीविष्णूंचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे त्यांनी कामावर जाणं बंद केलं आहे. इतकंच नव्हे तर देशात चांगला पाऊस पडत आहे, तोही त्यांच्याच तपश्चर्येचा परिणाम असल्याचा दावा त्याने केला आहे.

या साक्षात्कारी अधिकाऱ्याचं नाव रमेशचंद्र फेफर असं असून तो सरदार सरोवर प्रकल्प पुनर्वसन विभागाच्या अधीक्षक अभियंतापदावर कार्यरत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून फेफर सातत्याने कामावर गैरहजर आहे. त्यामुळे सरकारकडून त्याला नोटीस पाठवण्यात आली. त्या नोटिसीला उत्तर देताना फेफरने स्वतःला विष्णूचा दहावा अवतार कल्की असल्याचं म्हटलं आहे. ”मी कल्की असल्याने मी घरी राहून तपश्चर्या करत आहे. कार्यालयीन वातावरणात तपश्चर्या करणं शक्य नाही. म्हणून मी कार्यालयात येणार नाही. देशात होत असलेला भरपूर पाऊस म्हणजे माझ्या तपश्चर्येचं फळ आहे”, असं फेफर याने म्हटलं आहे.