Price of one kg sweet : 21 हजार रुपये किलोची मिठाई
Price of one kg sweet : दिवाळीचा सण जवळ आला आहे, त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर अनेक मिठाई बाजारात पाहायला मिळत आहेत. पण अहमदाबादची स्वर्ण मुद्रा मिठाई भारतभर आकर्षणाचे केंद्र आहे. 24 कॅरेट सोन्याचा थर असलेल्या या मिठाईची किंमत 21 हजार रुपये प्रति किलो आहे. एका किलोग्रॅममध्ये मिठाईचे 15 तुकडे असतात. म्हणजे एका मिठाईची किंमत 1400 रुपये आहे. बदाम, ब्लूबेरी, पिस्ता आणि क्रॅनबेरी अशा विविध घटकांसह मिठाई तयार केली जाते. अहमदाबादमधील ग्वालिया एसबीआर आउटलेटवर त्याची विक्री केली जात आहे.