बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : गुरूवार, 12 एप्रिल 2018 (08:12 IST)

वर्णद्वेशामुळे मला एका सिनेमात काम मिळालं नाही : प्रियांका

वर्णद्वेशामुळे मला एका सिनेमात काम मिळालं नसल्याचं अभिनेत्री प्रियांका चोप्राने सांगितल आहे. एका आंतरराष्ट्रीय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने हॉलिवूडमध्ये वर्णद्वेशाला सामोरं गेल्याचा अनुभव सांगितला आहे. प्रियांका म्हणाली की, ‘गेल्या वर्षी मी माझ्या त्वचेच्या रंगामुळे हॉलिवूडचा एक सिनेमा गमावला आहे. त्यामुळे मी अत्यंत निराश आहे. स्टुडिओमधून माझ्या मॅनेजरला आलेल्या फोनवर सांगण्यात आलं की, प्रियांकाची फिजिकॅलिटी योग्य नाही. याचा अर्थ मला समजला नाही. त्यावेळी माझ्या मॅनेजरने मला सांगितलं की त्यांना सिनेमासाठी ब्राऊन चेहरा नकोय.’