शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (17:24 IST)

भगवा कोणाचा आयोध्येत शिवसेना विरोधात विहिप

लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने राम मंदिराच्या मुद्यावरून वातावरण तापवले जात आहे. रविवारी म्हणजे 25 नोव्हेंबरला संघ परिवार आणि शिवसेना अयोध्येत आमने-सामने असणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाहीर सभा घेणार असून, त्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत धर्म धर्मसभेचं आयोजन केल आहे. शिवसेनेपेक्षा ही सभा मोठी व्हावी यासाठी संघ परिवाराने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे शिवसेना विरोधात विहिंप असे चित्र आहे. राम मंदिर बांधणं होत नसेल तर सांगा, आम्ही बांधतो असं थेट आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला त्यामुळे भाजपला आता भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. शिवसेना आयोध्येत आपले शक्तिप्रदर्शन करणार आहे. शिवसेनाला उत्तर देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं त्याच दिवशी अयोध्येत धर्मसभेचं आयोजन केले आहे. उत्तरप्रदेशात सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि अभाविप या संघपरिवारातल्या सर्व संघटना हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राम मोठे की राजकारण असा प्रश्न निर्माण झाला आहे.