गुरूवार, 25 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (08:39 IST)

डुडल बनवा, स्‍पृहा जोशीच चॅलेंज

sphru joshi
अभिनेत्री स्‍पृहा जोशीने आपल्‍या चाहत्‍यांसाठी एक खास चॅलेंज दिलं आहे. #Inctober नावाचं हे चॅलेंज असून या चॅलेंज अतंर्गत एक डुडल करायचं आहे. तुम्‍हा जे काही मनात वाटतील ते चित्र काढू शकता, असं स्‍पृहाने सांगितलं आहे. त्‍याबाबतचा एक व्‍हिडिओ स्‍पृहाने शेअर केलाय. 
 
तिने व्‍हिडिओत म्‍हटलं आहे, 'प्रत्‍येक वाढदिवसाला मी काहीतरी नवीन करायचं ठरवतं. पण, ३-४ दिवसांच्‍या पलिकडे ते मी पूर्ण करू शकत नाही. त्‍यामुळे यंदा मी  #Inctober नावाचं हे चॅलेंज सुरू केलं आहे. मी स्‍वत: ८ ऑक्‍टोबरपर्यंतची चित्रे काढली आहेत. त्‍याच्‍या पुढील चित्रे इन्‍स्‍टाग्रामवर टाकणार आहे. मी शाळेत असताना चित्रकलेच्‍या तासाला कधी बसले नाही, मला चित्र काढता येत नाहीत. माझी आई, बहिण किंवा माझी मैत्रीण अनुराधा ही सध्‍या स्‍पेनमध्‍ये असते, ही सगळी चित्रे काढून देत असत. आता चित्र काढताना कुठलेही मनात विचार येत नाहीत, टेन्‍शन येत नाही.'