गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

आश्चर्य, 'हे' आहेत भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती

D-Mart रिटेल चेन चालवणाऱ्या सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी  भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांचं एकूण उत्पन्न 17.5 अरब डॉलर म्हणजेच जवळपास 1,25,000 कोटी रुपये आहे. त्यांनी शि‍व नाडर, गौतम अदाणी यांना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत ते दुसऱ्या क्रमांकावर  आहे.
 
फोर्ब्स रियल टाईम बिलिनियरीज इंडेक्सनुसार, गेल्या आठवड्यात एव्हेन्यू सुपरमार्केटचे शेअर 5 टक्क्यांनी वधारले. त्यामुळे दमानी यांच्या उत्पन्नात वाढ झाली. शनिवारी दमानी यांचं उत्पन्न 17.8 अरब डॉलर पर्यंत पोहोचलं. त्यांच्यानंतर श्रीमंत भारतीयांच्या यादीत एचसीएलचे श‍िव नाडर (16.4 अरब डॉलर), उदय कोटक (15 अरब डॉलर) आणि गौतम अदाणी (13.9 अरब डॉलर) यांचा क्रमांक लागतो. मार्च 2017 मध्ये एव्हेन्यू सुपरमार्केटचा आयपीओ आल्यानंतर त्यांना रिटेल किंग म्हटलं जाऊ लागलं.