सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश!
महाड : देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने सर्वत्र प्रचार, सभा घेतल्या जात आहे. याच दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी रायगडमध्ये सात मे रोजी मतदान असून, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या महाडमध्ये आल्या होत्या. तर महाडमध्ये सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेले हेलिकॉप्टर क्रश झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना महामध्ये घडली असून हेलिकॉप्टरचा पायलट आणि सुषमा अंधारे या सुरक्षित असल्याची माहिती आहे. तर हेलिकॉप्टर क्रश होण्याचे नेमके कारण काय हे अजून कळले नाही आहे.
तसेच सुषमा अंधारे बसण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुषमा अंधारे २ दिवसांपासून रायगडमधील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गितेंच्या प्रचारासाठी रॅलीला संबोधित करत आहे. आज मुरुडला सुषमा अंधारे या आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी जाणार होत्या. घडले असे की, महाडमधील मैदानात जमिनीपासून काही अंतरावर असतांना पायलटचे नियंत्रण सुटल्याने हेलिकॉप्टर हे थेट जमिनीवर आदळले. तसेच हेलिकॉप्टरचे नुकसान झाले असून कोणीही जखमी झाले नाही. धुळीचे लोट अधिक प्रमाणात आल्यामुळे हि दुर्घटना घडली असा अंदाज लावण्यात येत आहे.
Edited By- Dhanashri Naik