मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2024 (10:20 IST)

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रामधील सत्तारूढ महायुती आणि विपक्षचे राज्य स्तरीय युती महाविकास आघाडी(MVA) यांनी मुंबईच्या सर्व सहा लोकसभा जागांसाठी आपले आपले उमेदवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय जनता पार्टी ने उत्तर मुंबई मधून पियुष गोयल यांना उमेदवार बनवले आहे. तर काँग्रेसने इथूनच भूषण पाटील यांना तिकीट दिले आहे. 
 
मुंबईमध्ये एकूण सहा लोकसभा जागा आहेत ज्यांवर महायुती आणि महाविकास आघाडी ने आपले आपले उमेदवार मैदानात उतरवले आहे. दक्षिण मुंबई मधून शिवसेना उद्धव ठाकरे गटातून अरविंद सावंत याना तिकीट दिले आहे. तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाने यामिनी जाधव यांना तिकीट दिले आहे. साऊथ सेंट्रल युबीटी यांनी अनिल देसाई यांना मैदानात उतरवले आहे. तर शिवसेनेने राहुल शेवाळे यांना तिकीट दिले आहे.  
 
नार्थ ईस्ट जागांसाठी संजय डी पाटील युबीटीचे उमेदवार आहेत. तर भाजपमधून मिहीर कोटेचा उमेदवार आहे. नार्थ सेंट्रलमधून काँग्रेसने वर्ष गायकवाड यांना तिकीट दिले आहे. ज्यांचा सामना भाजपचे उज्वल निकम यांच्याशी होईल. नॉर्थ वेस्टने युबीटीचे अमोल कीर्तिकर यांना आणि शिवसेनेने रवींद्र वायकर यांना तिकीट दिले  आहे. 

Edited By- Dhanashri Naik