सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (08:37 IST)

कॅबिनेट मध्ये दिसणार नवे चेहरे, 30 तारखेला होणार नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

eknath shinde devendra fadnavis
Mumbai News :  महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या मोठ्या विजयानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. तसेच यावेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे आमदार आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले. तसेच 30 तारखेपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल, असा दावाही त्यांनी केला.
 
मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाचे नेते शिरसाट म्हणाले की, प्रत्येक पक्षाच्या आमदारांना आपल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवायचे आहे, पण याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्रितपणे घेतील. ज्या दिवशी शपथविधी होईल, त्याच दिवशी काही कॅबिनेट मंत्रीही शपथ घेतील.   

याचे कारण अधिवेशनाची तारीख जवळ आली आहे आणि त्यावेळी बरीच कामे करायची आहे, त्यासाठी मंत्री असणे बंधनकारक आहे.