बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By संदीप पारोळेकर|

पर्यटकांना खुणावणारा चिखलदरा!

MH GovtMH GOVT
महाराट्रातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वंतरांगेत 'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी खुणावत असते. चिखलदरा या ठिकाणाला मनोरंजक इतिहास आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पार महाभारतात जावे लागते. पाच पांडव वनवासात असताना त्यांनी काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता, असे म्हणतात. भीमाने येथील राजा कीचकचा वध करून एका दरीत फेकून दिला होता. ती दरी म्हणजेच कीचकदरी होय. परंतु, कालांतराने कीचकनरीचे रूपांतर चिखलदरीत झाले व चिखलदरीचे चिखलदर्‍यात. चि‍खलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भात सर्वाधिक ऊन असते. निसर्गाची शितलता अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात.

चिखलदरा येथील हजारो फूट खोल दर्‍या या पर्यटकांचा काही काळ श्वास रोखण्यास कारणीभूत ठरतात. दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने अंघोळ केली होती, त्यामुळे या कुंडाला भीमकुंड असे नाव पडले आहे. असे म्हणतात.
MH GovtMH GOVT


सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते. मेळघाट परिसर हा 'व्याघ्रप्रकल्प' म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे चिखलदर्‍याच्या घाटात वाघोबाचे दर्शन घडू शकते. मोर, रानकोंबड्या, अस्वले, हरीन तर मुक्त संचार करतात. उन्हाळ्यात मात्र येथे पानझडी सुरू होते. कारण हा जंगल परिसर शुष्क पानझडी अरण्याच्या प्रकारात मोडते. परंतु पावसाळा व हिवाळ्यात सातपुड्याला सह्यादी पर्वताचे रूप प्राप्त होत असते.
  भीमाने येथील राजा कीचकचा वध करून एका दरीत फेकून दिला होता. ती दरी म्हणजेच कीचकदरी होय. परंतु, कालांतराने कीचकनरीचे रूपांतर चिखलदरीत झाले व चिखलदरीचे चिखलदर्‍यात. चि‍खलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे.      


च‍िखलदरा येथे विविध पॉइंट पर्यटकांचे स्वागत करत असतात. दरीच्या पायथ्याशी काही पायर्‍या उतरून गेले असता देवी पॉइंट आहे. डोंगराच्या एक भुयारात देवी वसलेली आहे. तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे. देवीच्या समोर एक कुंड आहे. कुंडातून पाणी‍ सरळ दरीत उडी घेते. देवीचे दर्शन झाल्यानंतर फेसाळलेला धबधबा मनमोहून टाकतो. देवी पॉइंटहून जवळच मोझरी पॉइंट असून त्याच्या बाजूला हरिकेत पॉइंटही आहे. वनोद्यानात संध्याकाळी कुटुंबियांसोबत फिरायला मज्जा येते. रात्री वाघांच्या डरकाड्या ऐकायला येतात. लहान मुलांसाठी गार्डन रेल्वेचीही सोय येथे करण्यात आली आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे कॉफी. येथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते.

चिखलदर्‍याच्या दक्षिणेला तीन किलोमीटरवर 'बहामनी किल्ला' आहे. किल्ला पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा वगैरे आहेत. इथली दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय इथले शक्कर तलाव, देवी तलाव, मछली तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

MH GovtMH GOVT
पंचबोल पॉइंट (युको पॉइंट) तर पर्यटकांना चक्राऊन टाकणारा आहे. चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. विराट देवी हा इथला प्रसिद्ध पॉइंट. चिखलदऱ्यापासून 11 किलोमीटर दूर डोंगरावर विराट देवीचे मंदिर बांधलेले आहे. खरी देवीचे मंदीर पश्‍चिमेकडील खोल दरीत एका भुयारात आहे. तेथे जाणे अशक्‍य असल्याने नवे मंदिर बांधण्यात आले.

कसे जाल?
महामार्ग- राष्‍ट्रीय महामार्ग क्र.6 वर अमरावती हे शहर आहे. तेथून चिखलदरा हे 94 किमी अंतरावर आहे. तेथून चिखलदरा येथे येण्‍यासाठी थेट एसटी सेवा आहे.

रेल्वे- मुंबई- हावडा या मुख्यरेल्वे मार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. तेथून अमरावतीसाठी येथे एस.टी. किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते. अमरावतीहून चिखलदरा 94 किमी अंतरावर आहे. एसटी व खाजगी वाहन सहज मिळते.