मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (22:26 IST)

सिंदखेड राजा, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ

राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील भुईकोट राजवाड्यात झाला.या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.
त्यांचे जन्मस्थळ सिंदखेड आज हे केवळ ऐतिहासिक स्थळच नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांचे समाधी स्थळ आहे.
ही  भव्य वास्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी आहे.
येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे .या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर 8व्या ते 10 व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.
येथे एक भव्य किल्ला काळाकोठ आहे.या किल्ल्याच्या भिंती 20 फूट रुंद आणि तेवढ्याच उंच आहे.येथे साकरवाडा नावाचा 40 फुटी उंच भिंतीचा परकोट बघण्यासारखा आहे.या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे. 
 
येथील मोतीतलाव देखील बघण्यासारखे आहे त्याकाळातील सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी ची उत्कृष्ट व्यवस्था करणारा हा तलाव आहे. याच्या समोर विलोभनीय परिसर आहे. याच बरोबर चांदणी तलाव देखील प्रेक्षणीय आहे. या तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती असे. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होत्या, या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे.
 
कसे जायचे- 
विमानाने जाण्यासाठी औरंगाबाद विमानतळ 92 किमी अंतरावर आहे.
रेल्वे ने जाण्यासाठी -जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानक 33 किमी आणि 96 किमी अंतरावर आहे.
रस्त्याने जाण्यासाठी- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानका वरून नियमित राज्य परिवहन बस सेवा उपलब्ध आहेत.