बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By

4 मार्च महाशिवरात्री: या शुभ मुहूर्तावर सोप्या पद्धतीने करा महादेवाची पूजा

महाशिवरात्री शुभ मुहूर्त:
शुभ मुहूर्त सुरू - 4 मार्च 2019 संध्याकाळी 04:28 
शुभ मुहूर्त समाप्त - 5 मार्च 2019 सकाळी 07:07
 
महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी पाण्यात किंवा दुधात मध मिसळावे. 
या शुभ संयोगात कर्ज मुक्तीसाठी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पित करावी.
आर्थिक संकटापासून मुक्तीसाठी महादेवाला फळांच्या रसाने अभिषेक करावा.
रसाभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते.
मोक्षाची आस ठेवणार्‍यांनी गायीच्या दुधाने अभिषेक केल्याने फायदा मिळेल.
अभिषेक केल्यावर शिवलिंगावर शेंदूर अर्पित करावे. 
धूप आणि दिवा लावावा. 
बेलाचे पान आणि विड्याची पाने अर्पित करावी. 
धान्य आणि फळं अर्पित करावे. 
नंतर ‘ओम नम: शिवाय' मंत्र जपावे.
व्रत करणार्‍यांनी ब्रह्म मुहूर्तात स्नान करून महादेवाची पूजा करावी.
व्रत करावे आणि संध्याकाळी महादेवाची पूजा आरती, आराधना करावी.