रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : गुरूवार, 12 जानेवारी 2023 (15:22 IST)

संक्रांती विशेष चविष्ट आणि चमचमीत बंगाली खिचडी

khichdi Recipe
साहित्य -
100 ग्रॅम मुगाची डाळ, 250 ग्रॅम बासमती तांदूळ, 1 फ्लावर किंवा फुल कोबी, 100 ग्रॅम मटार, 2 मध्यम आकाराचे बटाटे.
 
मसाला साहित्य-
1 तुकडा आलं, 2 हिरव्या मिरच्या, 2 अक्ख्या लाल मिरच्या, 1/2 चमचा  हळद, साखर चवी प्रमाणे, 1/2 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 तुकडा दालचिनी, तमालपत्र, 2 -3 लवंगा, 2 लहान वेलची, एक चमचा साजूक तूप, मीठ चवी प्रमाणे, तुपात तळलेले काजूचे तुकडे, कोथिंबीर.
 
कृती -
सर्वप्रथम तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने हाताने चोळून चोळून धुऊन घ्या. बटाटे सोलून लांब लांब तुकड्यात चिरून घ्या. फुलकोबीचे देखील मोठे तुकडे करून घ्या. आलं किसून ठेवा आणि हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
 
आता एका कढईत थोडं तूप घालून मुगाची डाळ गुलाबी रंग येई पर्यंत भाजून घ्या. भाजताना अजून तूप घालू नका. या तुपातच धुतलेले तांदूळ फुल कोबी, बटाटे अर्ध्या लीटर गरम पाण्यात मंद आचेवर शिजवून घ्या (पाणी आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करता येईल). लक्षात ठेवा की ह्याला झाकून शिजवायचे आहे.मधून मधून ढवळत राहा. 
 
खिचडी पूर्णपणे शिजल्यावर समजावं की खिचडी तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी एका पात्रात तूप गरम करून अख्खी लाल मिरची, जिरे, दालचिनी, तमालपत्र लवंग, वेलची आणि हिंगाची फोडणी तयार करून ही फोडणी खिचडीमध्ये वरून घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळा आणि हिरवी कोथिंबीर आणि काजूचे तुकडे घालून तयार बंगाली खिचडी कढीसह सर्व्ह करा.