Daily Horoscope
✕

वाण निवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शक: गहू लागवड

Updated: शनिवार, 17 ऑक्टोबर 2026 (15:56 IST)
१. जमीन आणि हवामान
जमीन: मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि ६.५ ते ७.५ सामू (pH) असलेली जमीन योग्य ठरते.
हवामान: थंड आणि कोरडे हवामान आवश्यक असते.

२. लागवडीची वेळ
बागायती (वेळेवर): १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर
उशिरा लागवड: १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर

३. सुधारित वाण (जाती)
बागायती (वेळेवर): फुले समाधान (NIAW-1994), एचडी-२१८९, एमएसीएस-६२२२, त्र्यंबक, गोदावरी.
जिरायती: पंचवटी, नेट्रावती, एनआयएडब्ल्यू-१४१५ (एमएसीएस-६४७८).

४. बियाण्याचे प्रमाण आणि बीजप्रक्रिया
बियाणे: बागायती वेळेवर पेरणीसाठी १०० किलो प्रति हेक्टरी; उशिरा पेरणीसाठी १२५ ते १५० किलो प्रति हेक्टरी.
बीजप्रक्रिया: पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थिरम किंवा कॅप्टन लावावे. त्यानंतर २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि २५ ग्रॅम पी.एस.बी. (PSB) जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.

५. पेरणीची पद्धत
दोन ओळींमधील अंतर २० सेमी (उशिरा पेरणीसाठी १८ सेमी) आणि दोन रोपांमधील अंतर ५ ते ७ सेमी ठेवावे.
बियाणे ४ ते ५ सेमी खोल पेरावे.
ALSO READ: ज्वारी लागवड कशी करावी? जमीन, सुधारित वाण, पेरणी आणि व्यवस्थापन माहिती
६. खत व्यवस्थापन (प्रति हेक्टरी)
बागायती (वेळेवर): १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश.
पेरणीच्या वेळी: नत्राचा अर्धा हप्ता (६० किलो) + संपूर्ण स्फुरद (६० किलो) + संपूर्ण पालाश (४० किलो) द्यावे.
उरलेला नत्राचा अर्धा हप्ता (६० किलो): पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी (पहिल्या पाण्यानंतर) द्यावा.

७. पाणी व्यवस्थापन (महत्त्वाचे टप्पे)
गव्हाला एकूण ५ ते ६ वेळेस पाणी द्यावे लागते:
मुकुटमुळे फुटण्याची वेळ: २१ ते २५ दिवस
फुटवे येण्याची वेळ: ४० ते ४५ दिवस
गाठ पडण्याची वेळ: ६० ते ६५ दिवस
फुलोऱ्याची वेळ: ७५ ते ८० दिवस
दाण्यात दूध भरण्याची वेळ: ९० ते ९५ दिवस
दाणे पक्के होण्याची वेळ: १०० ते १०५ दिवस
ALSO READ: कमी कालावधीत येणारे खरिपातील कडधान्य पीक: उडीद लागवड

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

महाराष्ट्र सरकारने सतीश वाघोळे यांच्याकडे MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला तर सौरभ कटियार सचिव बनले

'मुलगाच होणार' भविष्यवाणी चुकली अन् पुजाऱ्याने जीव गमावला; मुलगी झाल्याच्या रागातून हत्या

मुख्यमंत्री फडणवीस बनले शिक्षक! संघर्षाला घाबरू नका मुलांना दिला संदेश; BMC शाळांमध्ये आता घटनात्मक मूल्ये शिकवली जाणार

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा 'यलो अलर्ट

आयपीओ सुरू होण्यापूर्वी जिओवर अडीच लाख कोटी रुपयांची पैज, मागणी इश्यूच्या आकाराच्या ८ पट

पुढील लेख
Show comments