रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: अमळनेर , बुधवार, 25 जानेवारी 2023 (20:02 IST)

मंगळग्रह मंदिरात मान्यवरांच्या हस्ते मंगळेश्वर गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठा

Mangaleshwar Ganesha
येथील मंगळग्रह सेवा संस्था तर्फे मंगळग्रह मंदिरात गणेश जयंतीला (दि.२५ जानेवारी) मंंगळेश्वर गणेशाच्या चार अभिषेक मुर्तींची प्राणप्रतिष्ठा मंत्रोच्चाराच्या गजरात मान्यवरांच्या हस्ते विधीवत करण्यात आली.
 
Mangaleshwar Ganesha

यावेळी पानाफुलांची विलोभनीय सजावट करण्यात आली होती. प्राणप्रतिष्ठे वेळी वैशिष्ट्यपूर्ण अभिषेक करण्यात आले. अभिषेकासाठी मंगळग्रह सेवा संस्थेने पंचधातूच्या चार मंगळेश्वर गणेश मूर्ती उत्तर प्रदेशातील ममुराबाद येथून आणल्या होत्या. या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यात आली. आमदार संजय सावकारे, बेटी बचाव बेटी पढाव चे समन्वयक डॉ. राजेंद्र फडके, दाल परिवार ग्रुपचे प्रमुख प्रेम कोकटा, युवा नेते प्रताप पाटील यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
Mangaleshwar Ganesha

सदर विधी प्रसाद भंडारी,गणेश जोशी, अथर्व कुलकर्णी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, केशव पुराणिक, सारंग पाठक, सुनील मांडे यांनी पौराहित्य केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष  डिगंबर महाले, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, उपाध्यक्ष सुरेश पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, डि.ए.सोनवणे सेवेकरी उज्वला शाह, विनोद कदम, अनिल कदम, व्ही. व्ही. कुलकर्णी, उमाकांत हिरे आदींसह भाविकांची मोठी उपस्थिती होती.