गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Updated : बुधवार, 15 मे 2024 (10:05 IST)

मनोज जारांगेंनी दिला इशारा, 4 जून पासून सुरु होईल मराठा आरक्षण आंदोलन

मराठा समाज कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी इशारा दिला की 4 जून पासून पुन्हा आंदोलन सुरु करणार आहेत. या दिवसांमध्ये सुरु असलेले लोकसभा निवडणूक 2024 चे परिणाम येतील. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितले की, सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्था मध्ये भरती मध्ये मराठा समुदायाच्या आरक्षण मागणीवर दबाव बनवण्यासाठी 8 जूनला एक रॅली आयोजित केली जाणार आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे हे मागील वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनचे नेतृत्व करीत आहे. त्यांनी छत्रपती  संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण केले. ते म्हणाले की, ''आम्ही आमच्या मुलांसाठी आरक्षण मागत आहोत. आम्हाला दहा टक्के आरक्षण दिले गेले आहे. ज्याच्या काही फायदा नाही. हे पोलीस भारतीमधून सिद्ध झाले आहे.'' 
 
तसेच ते म्हणले की, आम्ही 4 जून पासून पुन्हा आंदोलन करणार आहोत. आनंदोलन शांतिपूर्व होईल. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की सरकार त्यांच्या मागण्यांवर विचार करेल. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील नारायणगड मध्ये रॅलीची तयारी जोरदार सुरु आहे.  

Edited By- Dhanashri Naik