शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (15:52 IST)

दत्त आरती - जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्‌गुरु माणिका ।

जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्‌गुरु माणिका । तव पद मोक्ष आम्हां न स्मरुं आणिका ॥जय.॥
काया वाचा मनें शुद्ध मी शरण तुसी ॥ ठेउनि मस्तकिं हस्तक जोती मिळविसी ॥ मुमुक्षूला मोक्ष क्षणाधें तूं देशी ॥ दाउनि चारी देह ब्रह्मा म्हणवीसी ॥जय.॥१॥
 
देहातीत विदेही योगीं मुगुटमणी ॥ कर्म शुभाशुभ करिसी हेतू नाहिं मनीं ॥ राजा अथवा रंक पाहसी सम दोनी ॥ तवसम साधु असतां परि योगित्वासि उणी ॥जय.॥२॥
 
परोपकारी अससी वर्णूं काय किती ॥ अकल्पिता तूं देसी करूं मी काय स्तुती ॥ वर्णावा गुरु महिमा शेषा नाहिं मती ॥ जग ताराया आलासी अंशत्रयमूर्तीं ॥जय.॥३॥
 
सुरवर इच्छिति दर्शन घेउं आम्हि त्यासी ॥ देवादिकां अप्राप्त प्राप्त तूं आम्हांसी ॥ पडतां चरण मी मुक्त होईन म्हणे काशी ॥ सुकृत बहु जन्मांचें नरसिंहापाशी ॥जय.॥४॥