शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By
Last Updated : बुधवार, 6 जानेवारी 2016 (17:56 IST)

कसे राहतील 2016मध्ये तुमचे प्रेम संबंध?

मेष : प्रेम-संबंधांच्या बाबतीत तुमच्यासाठी हे वर्ष अनुकूल नसले तरी तुम्ही सामाजिक सामाजिक तत्त्वाची परवा न करता प्रेम प्रकरणात पुढे जाल. पण यामुळे तुमचे नाव खराब होण्याची शक्यता आहे याची खबरदारी घ्या. म्हणून शक्य असल्या यापासून दूरच राहणे तुमच्यासाठी योग्य आहे. ऑगस्ट नंतर प्रेम-संबंधांमध्ये मधुरता येण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा संबंधांमध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे.  

वृषभ : हे वर्ष तुमच्या प्रेम-संबंधांसाठी उत्तम आहे. एक दुसर्‍यासोबत तुम्ही चांगला वेळ घालवला. सुरुवातीत काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे पण नंतर संबंधां गती मिळेल. तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ ऑगस्टनंतर समजेल. या वर्षी जेव्हा बुध अस्त होईल किंवा सिंह किंवा कुंभामध्ये प्रवेश करेल, तेव्हा आपल्या जोडीदारावर कुठल्याही प्रकारची शंका करणे टाळावे. आपल्या व्यवहारात संयम बाळगावा आणि जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवायला शिका. 
पुढे पहा मिथुन आणि कर्क राशींचे प्रेम संबंध... 
मिथुन  : तुम्ही स्वभावाने फारच रोमँटिक आहात. तुमच्या राशीतून 5व्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे, जो तुम्हाला रोमँटिक बनवतो. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला महारथ हसील आहे. तुम्ही द्विस्वभाव असल्यामुळे कुठल्याही एका महत्त्वाच्या गोष्टीवर जास्त काळापर्यंत लक्ष्य   केंद्रित करू शकत नाही. पण दीर्घकाळापर्यंत कुठल्याही गोष्टीचा आनंद  घ्यायचा असेल तर तुम्हाला या व्यवहाराचा त्याग करावा लागणार आहे. हे वर्ष तुम्हाला असा कुठला ही मोका देणार नाही ज्याने तुम्हाला काळजीत पडावे लागणार आहे. ऐकून हे वर्ष तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत फार आनंद देणार आहे म्हणून त्याचा भरपूर आनंद घ्या. 
 
कर्क : प्रेम-संबंधांच्या बाबतीत हे वर्ष फारच अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकता. तुमचे प्रेमसंबंध जास्त दिवस टिकत नाही. असे होण्याचे मुख्य कारण शनी सप्तमेश व अष्टमेशचा स्वामी आहे, जो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात तुमच्या संबंधांना खराब करतो. पण यावर जास्त लक्ष्य देऊ नका. आपल्या संबंधांना घट्ट बनवायचा प्रयत्न करा. 
 
पुढे पहा सिंह आणि  कन्या राशींच्या जातकांचे प्रेम संबंध... 
सिंह : या वर्षात प्रेम-संबंधांमध्ये मधुरता कायम राहील. रोमांसने तुम्ही परिपूर्ण राहाल. प्रेम-संबंध वैवाहिक संबंधात बदल होऊ शकतो. तुमच्या जीवनात शांती, प्रेम, सामंजस्य आणि समजदारी राहणार आहे. ऑगस्टनंतर प्रेमामध्ये रुची जास्त वाढेल.  
 
कन्या : प्रेम संबंधांसाठी हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम साबीत होणार आहे. जर तुम्ही एखाद्या नवीन नात्याची सुरुवात करणार असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी सर्वात उत्तम जाणार आहे. दुसरीकडे जे लोक संबंधांत आहे त्यांना देखील आत्मीय सुखाची प्राप्ती होईल. ऑगस्टपर्यंत  आपल्या नात्यात कुठल्याही प्रकारचा दुरावा निर्माण होऊ देऊ नका.  
 
पुढे पहा तूळ आणि वृश्चिक राशीच्या जातकांचे प्रेम संबंध.... 
तूळ : या वर्षी प्रेमाच्या बाबतीत तुम्ही अपयशी ठरणार आहे. या वर्षी तुम्हाला प्रेम-संबंधांचे सुख मिळणार नाही. अविवाहितांसाठी हे वर्ष लाभकारी नाही आहे. चंद्रमा जेव्हा सिंह, वृश्चिक, वृषभ आणि कुंभ राशीत प्रवेश करेल, अशा वेळेस कुठलेही नवीन कार्य सुरू करू नये अथवा गुरु किंवा शनीमधला एकही ग्रह वक्री किंवा अस्त असेल आणि तुम्ही त्याच्या दशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा किंवा महादशेतून जात असाल.  
 
वृश्चिक : प्रेम-संबंधांच्या बाबतीत हे वर्ष प्रसन्नतादायक आहे. ऑगस्टच्या आधी आपल्या प्रेम संबंधांना समजून घेण्यासाठी एक मेकनं समजून घेण्याची गरज आहे आणि आपसातील सामंजस्य ठेवून कुठले ही कार्य करायला पाहिजे. अशी स्थिती देखील येईल जेव्हा तुमच्यातील बोलाचाल बंद होईल. अशा स्थितीत हातावर हात धरून बसण्यापेक्षा समस्येला दूर करण्याचा मार्ग शोधने उत्तम. काही झाले तरी आपसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ऑगस्टनंतर वेळ अनुकूल होईल आणि तुमच्यातील नातं घट्ट होईल.  
 
पुढे पहा धनू आणि मकर राशीच्या जातकांचे प्रेम संबंध ... 
 
धनू : प्रेम आणि रोमांसच्या बाबतीत हे वर्ष सामान्य राहणार आहे. या वर्षी तुम्हाला कुठल्याही गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही आहे कारण सर्व काही सोप्यारित्याने पार पडेल. जर तुम्ही एखाद्यासोबत संबंध ठेवत असाल तर तुमच्या नात्यात कुठल्याही प्रकारचा अविश्वास येऊ देऊ नका कारण ऑगस्टपर्यंत वेळ तुमच्यासाठी अनुकूल नाही आहे. या महिन्यानंतर तुमच्या जीवनात भरपूर प्रेम मिळणार आहे.  
 
मकर : प्रेम आणि रोमांससाठी तुम्ही जास्त उत्साहित राहत नाही ज्यामुळे प्रेम, रोमांस आणि तुमच्यात बरेच अंतर आहे. पण जर तुम्ही कुणासोबत डेटिंग करत असाल तर सकारात्मक परिणामाची उमेद करू शकता. काही लोक थोडे रोमँटिक होऊ शकतात आणि आपल्या आवडीच्या लोकांशी भेटू शकता. मकर, कुंभच्या लोकांसोबत मिसळून राहिले तर उत्तम. 
पुढे पहा कुंभ आणि मीन राशीच्या जातकांचे प्रेम संबंध..
कुंभ : या वर्षी प्रेम-संबंध सामान्य राहणार आहे. व्यस्ततेमुळे प्रेमासाठी जास्त वेळ राहणार नाही. जर तुम्ही कुणासोबत आधीपासून डेट करत असाल तर स्थितीत काही जास्त बदल येणार नाही. जर कुणाप्रती तुमच्या मनात प्रेम असेल तर या वर्षी तुम्ही त्याच्यासमोर प्रेम प्रस्ताव मांडाल. यश मिळण्याची  जास्त उमेद आहे. जोडीदारासोबत संबंधात पूर्ण पारदर्शकता ठेवा. कुठल्याही प्रकाराची शंका येऊ देऊ नका. थोडा निष्काळजीपणा तुमच्या नात्यात दुरावा आणू शकते म्हणून सावधगिरी बाळगायला पाहिजे.  
 
मीन : हे वर्ष प्रेम संबंधांसाठी काही खास जाणार नाही आहे. काही लोक ज्यांचे मनात प्रेमाचे पालव फुटत आहे त्यांनी ऑगस्टपर्यंत थांबणे फारच गरजेचे आहे. ऑगस्टच्या दुसर्‍या टप्प्यापर्यंत तुम्ही एखाद्या खास व्यक्तीवर प्रेम प्रकट करू नका. असेही शक्य आहे की गैरसमजामुळे त्या व्यक्तीबद्दल तुमची धारणा बदलू शकते. कुणाचे मन दुखवणे योग्य नाही म्हणून कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नये.