शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By
Last Updated : बुधवार, 6 जानेवारी 2016 (17:57 IST)

मीन राशीच्या जातकांचे 2016 मधील संपूर्ण वार्षिक राशिभविष्यफल

नवीन वर्षांच्या सुरुवातीला राश्याधिपती गुरू जरी अनुकूल नसला तरी शनी आणि मंगळ या ग्रहांचे भ्रमण तुम्हाला अनुकूल आहे. त्या जोरावर बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या आहेत. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या म्हणीनुसार तुम्हाला पुढे जावे लागेल. जुलैनंतर पुढील दिवाळीपर्यंत तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल. मीन राशीच्या व्यक्तिंनो हे वर्ष तुमच्यासाठी गुलाबी बिछायतीचं न राहण्याची शक्यता आहे. 
 
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान... :
गृहसौख्य व आरोग्यमान... : कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नाही. काळजीपूर्वक वर्तन आणि हुशारीने कृती करणे तुमच्या मार्गीतल समस्या दूर ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. तुम्ही केलेली कोणतीही चूक मोठे परिणाम घडवू शकते; त्यामुळे, प्रत्येक गोष्टीबाबत अतिशय काळजीपूर्वक राहा. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये स्वत:ची तब्येत सांभाळा. आतडे, यकृत आणि मूत्रपिंड आपल्या चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. वर्षांच्या सुरुवातीला तुमच्या मनात थोडीशी चिंता असेल. आपल्या प्रिय व्यक्तींना सर्व काही देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.  जानेवारी ते एप्रिल या दरम्यान मुलांच्या प्रगतीकडे तुम्हाला विशेष लक्ष पुरवावे लागेल. घरामधल्या व्यक्तींच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. एप्रिल ते जुल या दरम्यान तुम्ही तुमचे हक्क मिळविण्याकरिता बंडखोर बनाल. जुल ते सप्टेंबर या दरम्यान अर्धवट राहिलेली अनेक कामे मार्गी लागतील. नवीन जागेचे बुकिंग करावेसे वाटेल.  
 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी.... :
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यापारउद्योगात पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण ठेवा. कंटाळा न करता तुमचे काम करत राहा. दिवाळी ते डिसेंबपर्यंत थोडासा कष्टदायी काळ आहे. केलेल्या कामाचे पसे वेळेत न मिळाल्याने थोडय़ा काळासाठी कर्ज काढावे लागेल. जानेवारीपासून एप्रिलपर्यंत तुमच्या मनामधल्या कल्पना हळूहळू आकार घेऊ लागतील. तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढायला लागेल. एप्रिल ते जुल या दरम्यान महत्त्वाची कामे वेग घेऊ लागतील. आपल्याला पुढे काहीतरी मिळणार या आशेने तुम्ही भरपूर काम कराल. नवीन भागीदारी किंवा मत्रीकरार प्रस्ताव पुढे यतील. जुलैपासून पुढील दिवाळीपर्यंत केलेल्या कामाची पावती मिळेल. आर्थिक बाबी सामान्य राहतील. 
 
नोकरीच्या आरंभिक टप्प्यांमध्ये समस्या उद्भवू शकतात; परंतु, तुम्हाला नंतरच्या काळात प्रचंड यश मिळेल. नोकरीतील प्रगती ही तुमच्या जीवनासाठी नशीब आणि कल्याण होण्याकरिता एक संचालन बलाचं काम करेल. व्यवसायिक नसलेल्या मीन राशीच्या व्यक्तिंना, ऑगस्टनंतर यशाची मोठी फळे चाखायला मिळतील. तुम्ही नव्या व्यवसायिक जोडीदारांसोबत देखील भागिदारी कराल. नोकरदार व्यक्तींना येत्या वर्षांत सफलता मिळवण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागेल. दिवाळीपासून डिसेंबपर्यंत एखादे किचकट आणि कष्टदायक काम उपसावे लागेल. तुमच्या अडचणींकडे वरिष्ठ कानाडोळा करतील. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान एखादे महत्त्वाचे प्रोजेक्ट तुम्हाला हाताळावे लागेल. एप्रिल ते जुल या दरम्यान मोठे उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत कराल. जुलैनंतर तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक वरिष्ठांकडून ऐकायला मिळेल. पगारवाढ किंवा विशेष सवलतींकरिता तुमची निवड होईल. सप्टेंबरनंतर परदेशगमनाची संधी उपलब्ध होईल. नवीन नोकरीही मिळू शकेल.
 
तरुणांना नवीन वर्षांत कष्टाशिवाय काही मिळत नाही, याची जाणीव होईल. जुलनंतर करियरमध्ये स्थिरता लाभून पुढील दिवाळीपर्यंत विवाह निश्चित होईल. कलाकार आणि खेळाडूंना आळस करून चालणार नाही. त्यांच्या क्षेत्रामधल्या असूयांचा त्यांना अनुभव येईल. त्यातूनच प्रगतीचे द्वार खुले होईल. जुलनंतर त्यांना प्रसिद्धी आणि मान-सन्मानाचे योग आहेत.