'मे' 2016तील मासिक राशीभविष्य
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)
मे - हा महिना आपल्याला अधिकतर ठीकठाक ठरेल. व्यापारात नव्या युक्त्यांचा फायदा होईल. भावुक होणे चांगले आहे, पण अती भावनिकता टाळा. सुख आणि धन प्राप्तीचे संकेत आहेत. सांध्यांचे दुखणे किंवा शल्य चिकित्सा होऊ शकेल. नोकरी व्यवसायात परिवर्तनामुळे घरापासून दूर राहावे लागेल.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) मे - या महिन्यातही स्थिती चांगली नसेल. नियोजीत कार्यक्रमानुसारच कामे करा. कौटुबिक प्रश्न भेडसावू शकतात, खासकरून स्त्रियांना. आपल्या धर्मस्थळात जाऊन प्रार्थना करा. महिन्याचा शेवट येता-येता चांगल्या परिस्थितीची सुरुवात होईल.
मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा) मे - जर तुम्ही परिश्रम केलेत तर प्रगतीचे नवे दरवाजे खुलतील. बदलत्या वातावरणामुळे स्वास्थ्य बिघडू शकते. आई-वडिलांशी बाचाबाची होण्याची शक्यता आहे. फ़िरायला जाण्याआधी घराच्या सुरक्षेची नीट तजवीज करून जा. मनोरंजनावर अधिक खर्च केल्यामुळे महिनाअखेरीस तुम्हाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागेल.