Dark knee home remedy : गुडघे काळे झाले आहेत का, मग हे घरगुती उपाय करा
Dark knee home remedy : गुडघे काळे होणे खूप सामान्य आहे, ही समस्या कोणालाही होऊ शकते. जास्त उन्हात राहिल्यामुळे गुडघे काळपट होतात. या शिवाय स्वच्छतेची काळजी न घेतल्यानेही गुडघे काळे पडतात. काही लोक क्रीम लावून काळपटपणा कमी करतात, तर काही घरगुती उपाय अवलंबवतात. गुडघ्याचा काळपटपणा कमी कसं करावे ते जाणून घेऊ या.
गुडघ्याचा काळपटपणा कमी करण्याचे उपाय-
* गुडघ्यांचा काळेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेल खूप प्रभावी आहे. रात्री गुडघ्यावर लावून झोपल्याने काळपटपणा कमी होतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मसाज करायला विसरू नका.
* लिंबू लावल्याने त्याचा काळेपणाही कमी होतो. मधात मिसळून दररोज गुडघ्यांना मसाज करा, व्हिटॅमिन सी गुणधर्म या समस्येपासून लवकर आराम देतात.
* गुडघ्यांचा काळपटपणा कमी करण्यासाठीही दही खूप उपयुक्त आहे. त्वचेचा काळपटपणा कमी करण्यासाठी हे उत्तमरित्या काम करते. असे दररोज केल्यास लवकरच आराम मिळेल.
* लिंबूमध्ये मध आणि साखर मिसळून घुडग्यांवर चोळावे. यामुळे त्या गुडघ्याचा काळपट पणा हळूहळू नाहीसा होऊ लागतो. असे केल्याने तुम्ही या समस्येवर मात कराल.
* या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा देखील उपयुक्त आहे. हे फक्त दुधात मिसळून त्या भागात लावा आणि कोमट पाण्याने स्वच्छ करा.
* गुडघ्यांचा काळेपणा हळदीनेही कमी करता येतो.