फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, नातवाईकांशी भेटणे घडत असतं. अशात घरगुती उपायांनी आपण त्वचेला चमकदार करू शकता...
लिंबू- लिंबू आपला रंग हलका करण्यात आणि खोलपर्यंत स्वच्छ करण्यात मदत करतात. लिंबू आपल्या त्वचेवरील डाग मिटवून त्वचा चिकनी करण्यास मदत करतं. बेसन किंवा किसलेल्या काकडीत लिंबाचा रस मिसळून लावा. काही दिवसात फरक जाणवेल.
हळद- नैसर्गिक रूपानं त्वचेत उजळपणा यावा यासाठी हळद उपयोगी ठरते. यात कच्चं दूध मिसळून चेहर्यावर लावल्याने रंग उजळेल.
बेसन- बेसन एक नैसर्गिक आणि प्रभावी फेसपॅक रूपात वापरलं जातं. बेसनात दूध किंवा दही आणि चिमूटभर हळद मिसळून वापरू शकता. यात लिंबाचा रस किंवा टॉमेटो रस देखील मिसळता येईल.
चारोळी- दुधात चारोळी पावडर मिसळून फेसपॅकच्या रूपात वापरता येईल.