गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (19:38 IST)

Fecial for Normal Skin फेशियल करताना घेण्यात येणारी काळजी

beauty
Fecial for Normal Skin नॉर्मल स्कीनसाठी (सामान्य त्वचा) : नॉर्मल स्कीनमध्ये ताजगी व लवचिकपणा असतो. अशी त्वचा जास्त तेलकट किंवा जास्त कोरडी नसते. या त्वचेची व्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने चेहरा स्वच्छ धुवावा नंतर क्लींजिक मिल्कने स्वच्छ करावा. त्यानंतर चांगल्या क्रीमने मसाज करायला हवा. सर्वांत शेवटी चेहर्‍याला कापसाने स्वच्छ पुसून काढावे. हे फेशियल रात्री करायला पाहिजे. याने चेहरा स्वच्छ व आकर्षक दिसेल.  
 
ड्राय स्कीन (कोरड्या त्वचेसाठी) : ड्राय स्कीन दिसायला नीरस व कोरडी दिसते. ड्राय स्किनवर नैसर्गिक प्रभाव लवकर पडतो. त्वचेची योग्य देखरेख नाही केली तर लवकरच सुरकुत्या पडायला लागतात. अशा प्रकारच्या त्वचेवर साबण कमी कमी वापरला पाहिजे. ज्या महिलांची त्वचा कोरडी असेल त्यांनी ए, बी, सी आणि डी जीवनसत्त्वाचा उपयोग केला पाहिजे. चेहरा नेहमी ग्लिसरीनयुक्त साबणाने धुतला पाहिजे.