रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (20:33 IST)

5 benefits of laughing हे आहे हसण्याचे 5 फायदे ...

5 benefits of laughing आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या दबावाखाली आम्ही विसरूनच जातो की आम्ही मनसोक्त केव्हा हसलो होतो. जेव्हाकी हसणे आम्हा सर्वांसाठी फारच महत्त्वाचे आहे, तरी ही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हसण्याने आपले आयुष्य निरोगी आणि आनंदी राहत. म्हणून हसण्याच्या पाच फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
 
1. हसण्याने हृदयाचा व्यायाम होतो. रक्त प्रवाह देखील चांगल्या प्रकारे होतो. हसताना, शरीरातून रासायनिक द्रव्य एंडॉर्फिन सोडले जाते. आणि हे द्रव्य आपल्या हृदयाला मजबूत बनवते. हसण्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.
 
2. एका संशोधनानुसार, ऑक्सिजनच्या उपस्थितीत, कर्करोगाच्या पेशी आणि अनेक प्रकारचे हानिकारक जिवाणू आणि व्हायरस नष्ट होतात. हसण्याने आपल्याला अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती खूप मजबूत होते.
 
3. सकाळी जर हास्य ध्यान योग केले तर दिवसभर आपण आनंदी राहतो. जर रात्रीच्या वेळी केले तर आपल्याला चांगली झोप लागते. हास्य योगामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या हार्मोन्सचा स्राव होतो, ज्यामुळे मधुमेह, पाठीचे दुखणे आणि तणावग्रस्त व्यक्तींना आराम मिळतो.
 
4. हसण्यामुळे सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. सकाळी आनंदी राहण्याने ऑफिसचे वातावरण देखील आनंददायी होत. म्हणून मित्रांनो, आपण सर्वजण दोन किंवा चार चुटकुले वाचून आपल्या दिवसाची सुरुवात हसून करावी.
 
5. दररोज एक तास हसण्याने 400 कॅलरीज ऊर्जाचा वापर होतो, ज्यामुळे लठ्ठपणा देखील नियंत्रणात राहतो. आजकाल बरेच हास्यक्लब देखील तणावपूर्ण जीवनात हसण्याच्या माध्यमाने दूर करण्याचे काम करत आहे.