1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (13:38 IST)

चेहऱ्यासाठी मध अत्यंत फायदेशीर, लावण्यापूर्वी एकदा नक्की वाचा

मध वापरून आपण केवळ बऱ्याच रोगांपासून मुक्तच होऊ शकत नाही तर त्वचेला सुंदर बनविण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. मधात बरेच पोषक घटक असतात, जे डाग, मुरूम आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतात. याला नियमितपणे चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील चमक वाढते. हे त्वचेच्या छिद्रांमधील दडलेली घाण बाहेर काढतं. आपण याचा वापर स्किन केयर रुटीन मध्ये देखील करू शकता.
 
काही दिवस आपण ह्याचा वापर केल्याने आपल्याला स्वतःच्याच चेहऱ्यावर स्पष्ट फरक दिसून येईल. चला तर मग ह्याचा वापर कसा करावा हे जाणून घेऊ या.
 
* आपल्या हातात एक चमचा मध घ्या आणि ह्याला आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळ 5 ते 30 मिनिटे तसेच राहू द्या नंतर गरम पाण्याने धुऊन घ्या. या शिवाय आपली इच्छा असल्यास त्वचेवर 1 मोठा चमचा ताक,1  चमचा मध आणि अंड्यामधील पिवळे बलक मिसळून आपल्या त्वचेवर लावा 20 मिनिटे तसेच ठेवून नंतर पाण्याने धुऊन घ्या.
 
* चेहऱ्यावरील लागलेल्या मेकअपला मधाने स्वच्छ करू शकतो. हे वापरण्यासाठी मध आणि ऑलिव्ह तेल मिसळा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. याला कापसाने पुसून गरम पाण्याने धुऊन घ्या. याला चेहऱ्यावर लावल्याने सर्व मुरूम निघतात आणि चेहरा तजेल होतो. चेहऱ्याची चमक तशीच राहते.
 
* त्वचे वरील मृत पेशी काढण्यासाठी बदामाची भुकटी आणि 2 चमचे मध मिसळा. नंतर याला आपल्या त्वचे वर स्क्रब करा आणि ताज्या पाण्याने धुऊन घ्या. बदाम हे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करतं, आणि मध हे मॉईश्चराइझ करण्याचे काम करतं.
 
* जर या दिवसात आपली त्वचा कोरडी पडत असेल तर, एक चमचा मधात एक चमचा ऑलिव्ह तेल आणि लिंबाचा रस मिसळा. या लोशन ला ज्या ठिकाणी त्वचा कोरडी आहे तिथे 20 मिनिटा साठी लावा. नंतर याला साध्या पाण्याने धुऊन घ्या.