नवरात्रासाठी मेकअप टिप्स : घरातच ट्राय करा 'न्यूड मेकअप'
मेकअप तर सर्वच करतात पण सध्याच्या काळात 'न्यूड मेकअप' करण्याची पद्दत जोरात सुरु आहे. 'न्यूड मेकअप' चा ट्रेंड बॉलिवूड सेलिब्रिटीं पासून ते सामान्य लोकांपर्यंत आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सगळे सण घरातल्या घरात साजरे करावे लागत आहेत. नवरात्रात गरबे सुद्धा ऑनलाईन करण्यात येत आहे.
नवरात्राच्या काळात जर आपल्याला घरात राहूनच योग्य असं लूक मिळवायचे असल्यास, न्यूड मेकअप आपल्या साठी एक चांगला पर्याय आहे.
'न्यूड मेकअप ' म्हणजे कमीत कमी मेकअप मध्ये सुंदर दिसणं. हे करताना असं शेड्स निवडा, जे आपल्या त्वचेच्या टोनशी जुळणारं असावं. संपूर्ण चेहऱ्यावर इतर कोणतेही रंगाचे वापर केले जातं नाही. मेकअप केल्यावर चेहऱ्या पूर्णपणे नैसर्गिक दिसतो आणि सौंदर्य उजळतं आणि नैन नक्ष उठून दिसतात.
1 चेहरा धुवून घ्या, आता क्लिन्झर आणि टोनर लावा.
2 चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा.
3 मेकअप बेस बनवा आणि हे जेवढे न्यूट्रल असेल त्यामुळे आपले सौंदर्य उजळून दिसेल.
4 आपण चेहऱ्याचा रंगा पेक्षा एक हलक्या रंगाचा फाउंडेशन वापरा. आता ब्रशने एकसारखे पसरवून घ्या.
5 आपण कॉम्पेक्ट पावडर देखील फाउंडेशनच्या रंगाचे वापरा.
6 आपल्या त्वचेच्या टोनला साजेशे कंसीलर चेहऱ्या आणि जवळ च्या भागास डाग लपविण्यासाठी लावा.
7 आपल्या त्वचेच्या टोनशी साजेशी जुळणारा ब्लशर लावा.
8 आता न्यूड किंवा न्यूट्रल रंगाचे आयशॅडो लावा. शिमर आयशॅडोचा वापर करू नका. फक्त मॅट आयशॅडोच वापरा.
9 आयलायनर, काजळ लावल्यानंतर ट्रान्स्परन्ट मस्कारा चे एक कोट लावा.
10 आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रो कलरने आयब्रोला आकार देऊ शकता.
11 आपल्या त्वचेच्या टोन शी जुळणारी फिकट रंगाची लिपस्टिक किंवा लिप बाम लावा.