रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified रविवार, 9 मे 2021 (17:02 IST)

कांद्याच्या सालांमध्ये आरोग्य आणि सौंदर्याचे गुपित आहे

कांद्याच्या वापर करण्यापूर्वी आपण त्याचे साल टाकून देतो. परंतु या सालांमध्ये आरोग्याचे आणि सौंदर्याचे गुपित आहे हे माहिती झाल्यावर आपण ते फेकणार नाही चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतो - या साठी आपल्याला कांद्याची साले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची आहे. सकाळी ते पाणी प्यायचे आहे. याची चव चांगली नसेल तर आपण या मध्ये साखर आणि मध घालू शकता. दररोज याचा सेवन केल्याने काहीच दिवसात फरक पडेल. 
 
2 त्वचेची ऍलर्जी दूर करतो- त्वचेवर एलर्जी असल्यास कांद्याच्या साली रात्रभर पाण्यात भिजत टाकून सकाळी त्या पाण्याने त्वचा स्वच्छ करा. 
 
3 केसांना सुंदर बनवत -आपण केसांना चमकदार बनविण्यासाठी कंडिशनर चा वापर करतो. त्या ऐवजी आपण कांद्याच्या सालीचे पाणी वापरा. या मुळे आपले केस चमकदार आणि मऊ होतील. 
 
4 चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी -चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी कांद्याचे रसाळ साल वापरा. या साठी आपण कांद्याच्या सालामध्ये हळद मिसळून डाग असलेल्या जागेवर लावा. फरक दिसेल. 
 
5 घसा खवखवणे बरे होते- घसा खराब झाला असल्यास कांद्याचे साल गरम पाण्यात उकळवून घ्या नंतर हे पाणी पिऊन घ्या घशा संबंधित समस्यांसाठी  कांद्याचा हा चहा प्रभावी ठरेल.