शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

तंजावरचा राजगोरी घाट

श्‍मशान भूमी... नाव ऐकताच दचकलाच ना. मानवी आयुष्‍याचा शेवटचा टप्‍पा असलेली ही जागा एखाद्या धर्मिक स्‍थळासारखी पूजनीय असल्‍याचं आणि तिच्‍याजवळून वाहणारी नदी गंगा नदी प्रमाणे पवित्र असल्‍याचं तुम्‍ही कधी ऐकलयं? नाही ना?

WD
पण हे खरयं. तंजावरच्‍या एका नदी किनारी आहे एक श्मशान भूमी. तिथल्‍या रहिवाशांच्‍या दृष्‍टीने ती एखाद्या धर्मस्‍थळासारखी पूजनीय आहे. अनेक वर्षांपासूनच इथली ही परंपराच आहे. जशी प्रत्‍येकाची मेल्‍यानंतर आपला अंत्‍यसंस्‍कार गंगा किना-यावर व्‍हावा असं वाटतं. अगदी तस्‍सच इथ वास्‍तव्‍यास असलेल्‍या लोकांना राजगोरी श्‍मशान भूमीबद्दल वाटतं. याच भूमीवर आपला अंत्‍यसंस्‍कार केला जावा आणि त्‍यासंबंधीत सर्व विधी इथल्‍या 'वदावरू' या नदीवर व्‍हावे अशीच प्रत्‍येकाची इच्‍छा असते.

अंत्‍यसंस्‍कारासाठी सर्वाधिक दहन स्‍थळ असलेली ही सर्वांत मोठी श्‍मशान भूमी आहे. इथे एका वेळला किमान 20 जणांवर अंत्‍यसंस्‍कार करता येत असल्‍याची माहिती इथल्‍या एका कर्मचा-याने दिली.

WD
या घाटाच्‍या दूस-या बाजूलाही अनेक दहन स्थळ आहेत. इथले कर्मचारी वेट्टियन यांनी याबाबत माहिती देताना सांगितल, की हे सर्व तंजावरच्‍या राजघराण्‍याशी संबंधित आहेत. तर दुस-या ब्राह्मण आणि नायक समाजासाठी आहेत. 21 व्‍या शतकातही आपल्‍या समाजात जातीभेद इतका पक्‍काय की इथे अजुनही प्रत्‍येक जातीसाठी वेगळी श्‍मशानभूमी आहे.

WD
इथून वाहणारी वदावरू ही नदी कावेरी नदीची उपनदी असून तिला गंगा इतकचं पवित्र समजलं जातं. आपल्‍या नातेवाईकांच्‍या अंत्‍यसंस्‍कारासाठी येणारे लोक याच नदीत स्‍नान करतात. या नदीत आंघोळ केल्‍याने मृत्‍युलोकातील सगळे दोष दूर होत असल्‍याची इथल्‍या लोकांची श्रध्‍दा आहे.

आपल्‍या देशात मंदीर, चर्च, मशीदी आणि बौद्ध व जैन धर्म स्थळांची अजिबात कमतरता नसताना एखाद्या श्मशान भूमीला तंजावरचे लोक पवित्र मानतात हे न उगडणारे कोडे आहे. तुम्‍हालाही अशा काही वेगळेपण असलेल्‍या गोष्‍टी माहीत असतील तर आम्‍हाला नक्‍की कळवा.