बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 26 मार्च 2018 (16:15 IST)

अनेक सुट्ट्या मार्च एंडची कामे उरकून घ्या

यंदाच्या मार्च एंडला सलग चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे ज्यांची बॅंकांची कामे शिल्लक असतील त्यांनी दोन दिवसातच कामे करून घ्यावीत. कारण 29 मार्चपासून 1 एप्रिलपर्यंत बॅंकांना सुट्या आहेत. यामध्ये 29 मार्चला महावीर जयंती, 30 मार्चला गुड फ्रायडे, 31 मार्चला इअर एन्डिंग आणि 1 एप्रिलला रविवार आहे.ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक बँकांनी या सलग आलेल्या सुट्यांबाबत आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान बॅंका बंद असल्यामुळे एटीएममध्येही रोख रकमेची कमतरता जाणवू शकते त्यामुळे कॅशची व्यवस्थाही आधीच करून ठेवा.