सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated: बुधवार, 17 जून 2020 (19:35 IST)

कोका-कोला आता बटरमिल्क विकणार

कोका-कोला इंडिया कंपनीने आपल्या डेअरी शीतपेय ब्रँड वियोअंतर्गत स्पाईस्ड बटरमिल्क अर्थात मसाला ताक बाजारात उपलब्ध केलं आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव किंवा रंग मिसळण्यात आले नसल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. १८० एमएलच्या छासच्या पॅकची किंमत १५ रूपये ठेवण्यात आली आहे. 
 
मुख्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वियोचं मसाला ताक विकत घेता येऊ शकणार आहे. हे ओडिशा, आंध्र प्रदेश, गोवा, महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये तसंच दिल्ली आणि चेन्नईमधील दुकानांमध्येही उपलब्ध असेल.