शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आंतरराष्ट्रीय दुकाटीची भारतात तरुणांसाठी स्वस्त बाईक

जगात प्रसिद्ध असलेली आणि सुपरबाईक निर्मिती करणारी इटाली येथील कंपनी दुकाटीने (Ducati) नवीन सुपर बाईक लाँच केली असून, स्क्रॅम्बलर असं या बाईकचे नाव आहे.

बाईकची (एक्स-शोरुम) दिल्ली येथील  किंमत 7 लाख 89 हजार रुपये ते 10 लाख 49 हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे. सोबतच कंपनीने पाच प्रकारचे व्हेरियंट दाखल केले आहेत. दुकाटीच्या नव्या बाईकमध्ये दोन रंग असून ती  पिवळा आणि केसरी रंगात उपलब्ध केली आहे.

या बाईकची डिझाईनही सर्वांना आकर्षित करताना दिसून येते आहे. या बाईकमध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट दिले आहेत. आयकॉन, मॅच 2.0, क्लासिक, फुल थ्रोटल, कॅफे रेसर हे पाच व्हेरियंट दिले आहेत. सोबतच  13 लीटरची फ्यूअल टॅक,  6 गिअर, 803 सीसी, इलेक्ट्रॉनिक फ्यूअल इंजेक्शन सुद्धा अंर्तभूत आहे.

या गाडीत एबीस सिस्टम आहे. तर तिचे वजन  170 किलो आहे. दुकाटीच्या प्रत्येक बाईकची किंमत ही 15 लाख ते 50 लाखांपर्यंत असते यामुळे या १० लाखाच्या आतील बाईकने सर्वाना आकर्षित केले आहे.