शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (14:40 IST)

1 नोव्हेंबर पासून LPG च्या डिलिव्हरीशी निगडित नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : येत्या 1 नोव्हेंबर पासून देशात LPG सिलेंडरशी संबंधित नियमांमध्ये फार मोठा बदल होणार आहे. या दिवसापासून गॅस सिलेंडर्सच्या होम डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. 
 
असे सांगण्यात येत आहे की हे नवे नियम बदलल्यामुळे गॅस सिलेंडरची चोरी रोखण्यास आणि ग्राहकांना ओळखण्यास मदत मिळेल. 
 
आता आपल्याला फक्त गॅस बुकिंग करून ताबडतोब गॅस डिलिव्हर होणार नाही. तर या साठी आपल्या नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबर वर एक कोड पाठविण्यात येईल. हा कोड आपल्याला डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला सांगावा लागेल. त्या नंतरच आपल्याला गॅस सिलेंडर मिळेल.
 
या साठी आपला मोबाईल नंबर गॅस कंपनी कडे नोंदवणे आवश्यक आहे. हे अ‍ॅप डिलिव्हरी करणाऱ्या मुलाकडे देखील असणार. या साठी आपल्याला आपला मोबाईल नंबर अपडेट करावा लागणार त्या नंतरच कोड देखील जनरेट केला जाणार.