रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जुलै 2019 (11:10 IST)

Neflix मोबाइल यूजर्ससाठी लवकरच आणत स्वस्त प्लान, जाणून घ्या किती स्वस्त होऊ शकतात प्लान

घरगुती बाजारात अमेजन प्राइम व्हिडिओ आणि इतर स्थानीय व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपन्यांकडून वाढत्या स्पर्धेबाबत व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सची योजना स्वस्त प्लान सादर करण्याची आहे. कंपनी फक्त मोबाइलवर व्हिडिओ बघणार्‍या प्रेक्षकांसाठी स्वस्त योजना आणू शकते.
 
नेटफ्लिक्सचे मानणे आहे की भारतीय बाजारात वृद्धी करणे म्हणजे मॅराथन धावल्या सारखे आहे. कंपनीने एका विधानात सांगितले की बर्‍याच महिन्यांपासून प्रयोग केल्यानंतर आम्ही मोबाइल स्क्रीनवर व्हिडिओ बघणार्‍यांसाठी खास करून स्वस्त योजना सादर करण्याचा निर्णय करत आहे.
 
कंपनीने म्हटले की या योजनेेेला तिसर्‍या त्रैमासिक मध्ये सादर करण्यात येईल. त्यांचे मानणे आहे की या योजनेच्या मदतीने अधिकाधिक भारतीयांना नेटफ्लिक्सकडे आकर्षित करण्यात येईल, कारण देशात टीव्हीवर प्रति व्यक्ती सरासरी भुगतान फारच कमी आहे.
 
योजना
कंपनी मागील काही महिन्यांपासून मोबाइल ग्राहकांसाठी 250 रुपये मासिकच्या योजनेचे परीक्षण करत आहे. तसे कंपनीचे सध्याचे प्लान 500 रुपये महिन्यापासून सुरू होत आहे.