गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (12:20 IST)

सणासुदीत एस बी आयचे डेबिट कार्ड ब्लॉक

एकमात्र सर्वात मोठी बँक  स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सहा लाख ग्राहकांचे डेबिट कार्ड ब्लॉक केले आहे. अनेक एटीएममध्ये व्हायरस घुसल्याच्या भितीने बँकेने तात्काळ हे कार्ड ब्लॉक केल्याची माहिती दिली आहे. तर अनेक ठिकाणी फसवणूक करण्याच्या दृष्टीने  कार्डांचे क्लोनिंग करुन गैरव्यवहार सुरु होते.त्यात अनेक ग्राहकांना लाखो रुपये फसवणूक झाल्याचे समोर आले होते.
 
स्टेट बँक ऑफ इंडियाला देशातील अनेक ठिकाणाहून फसवणूक आणि इतर  तक्रारी येत होत्या. त्यामुळे बँकेने तडकाफडकी डेबिट कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. हे सुरक्षेचे उल्लंघन असून अन्य बँकांचे एटीएम वापरल्याने ही समस्या उदभवल्याचे एसबीआयचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी  सांगितले आहे . एसबीआय नेटवर्कमधील सर्व एटीएममशीन सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्या ग्राहकांना हा त्रास झाला असेल त्यांनी त्यांच्या शाखेत याबाबत चोकशी करावी.