शासन सिनेमात सिद्धार्थ सांगतोय पोलिसांच्या व्यथा

marathi movie shashan
Last Modified गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (14:29 IST)
राजकारणावर आधारित शासन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय., शेखर पाठक प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमात सिनेसृष्टीतले नामवंत कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा सिद्धार्थ जाधव हा ही या सिनेमाचा एक भाग आहे. राजकारण एक असा खेळ आहे की त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो. सामान्य नागरिक तसेच कलाकार , नेते मंडळी यांच्या संरक्षणासाठी कायम तत्पर असलेला पोलिस दल अनेकदा दुर्लक्षित केला जातो. पोलिस ही माणूस आहे, त्यांच्याही स्वतःच्या काही गरजा आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता एक लाख नागरिकांच्यापाठी पाचशे पोलिस आहेत,त्यामुळे त्यांना अतिरिक्त काम करावे लागते. गणेशेत्सोव, नवरात्र तसेच अनेक सणांमुळे , विविध ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुका, व्हीआयपी पोलिस बंदोबस्त अशा विविध कारणांमुळे पोलिसांच्या उरल्या सुरल्या रजाही वाया जाते. अशा अनेक पोलिसांच्या समस्या या सिनेमातून दाखवण्यात आल्या आहेत. सिद्धार्थने या सिनेमात पोलिस हवालादारची भूमिका केली आहे. सिद्धार्थने आपल्या अभिनयाने ही भूमिकाही तितकीच जिवंत केली आहे. पोलीसही माणूस आहे, हे त्याने या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. गजेंद्र अहिरे यांनी या सिनेमाच दिग्दर्शन केल असून नरेंद्र भिडे यांनी सिनेमाला संगीत दिल आहे.
marathi movei shasan
श्रेया फिल्म्स या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या सिद्धार्थ जाधव याच्यासह भरत जाधव, मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी,मनवा नाईक, अदिती भागवत, वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले, मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो

देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो
देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो

बायकांना काहीच पसंत पडत नाही

बायकांना काहीच पसंत पडत नाही
लेले काकू : बघा, मंडईतून भाजी आणण्यापासून ऑलम्पिक मेडल पर्यन्त सगळं बायकांनाच आणावं ...

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? 5 तपास ...

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? 5 तपास यंत्रणांच्या हाती काय लागलं?
मयांक भागवत 14 जून 2021...बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण ...

श्रीक्षेत्र माहूर गड

श्रीक्षेत्र माहूर गड
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे.माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ...

सुशांत सिंह राजपूतचे शेवटचे काही तास कसे होते?

सुशांत सिंह राजपूतचे शेवटचे काही तास कसे होते?
मधु पाल वोहरा बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला येत्या 14 जून रोजी एक वर्ष ...