‘अग्निहोत्र २’ ची उत्सुकता शिगेला
तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र २’ ही मालिका नव्या कथेसह स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होत आहे. यामध्ये नेमकी कोणती गोष्ट उलगडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘अग्निहोत्र २’ विषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ”१० वर्षांचा काळ उलटला तरी आजही अग्निहोत्रच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. एखाद्या मालिकेचा इतका प्रभाव असणं हे भारावून टाकणारं आहे. प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार करण्यात आला आहे.
‘अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘अग्निहोत्र २’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि या टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.