गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 10 मार्च 2021 (15:43 IST)

मराठी चित्रपट ‘‘झिम्मा’ चा टीझर अमिताभ बच्चन यांनी केला शेअर

दिग्दर्शक व लेखक हेमंत ढोमे यांच्या नव्या कोऱ्या ‘झिम्मा’ या मराठी चित्रपटाचा टिझर अमिताभ बच्चन यांनी टीझर शेअर केला आहे. 

अमिताभ बच्चन यांनी ‘सात बाई सात.बायका सात! जिवाची सफर.आता राणीच्या देशात!’ असे टि्वट केले होते. बिग-बी अमिताभ बच्चन यांनी टि्वट केल्याबद्दल सर्व कलाकारानी त्यांचे आभार व्यक्त केले. एवढच नाही तर , गायक मिका सिंगनेही ‘झिम्मा’ या चित्रपटाचा टिझर टि्वट केला आहे. मनसे नेते अमेय खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर, हा चित्रपट येत्या २३ एप्रिल रोजी प्रदर्शीत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठी चित्रपटसृष्टितील ‘झिम्मा’ या चित्रपटात निर्मीती सांवत, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बादेंकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, आणि क्षिती जोग सारखी दमदार कलाकार असणार आहेत. त्यामुळे अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहता आहे.