रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (15:24 IST)

अमृताने केला चाहत्यांसोबत आणि डिजिटल माध्यमांसोबत बर्थ डे साजरा

मराठीची सुपरनायिका अमृता खानविलकरसाठी यंदाचे वर्ष खूप खास गेलं आहे. हिंदीतील 'राझी', 'सत्यमेव जयते' हे सुपरहिट चित्रपट आणि 'डेमेज्ड' या वेबसिरीजमुळे तिला बॉलिवूडमध्ये नवी ओळख प्राप्त झाली आहे. अमृताच्या या यशस्वी वाटचालीमध्ये तिच्या चाहत्यांनीदेखील मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे, या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी यंदाचा वाढदिवस, अमृताने खास आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला. सांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बर्थ डे पार्टीचा तिच्या चाहत्यांनी मनमुराद आनंद लुटला. या पार्टीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रसारवाहिन्या आणि वृत्तपत्र या माध्यमांऐवजी पहिल्यांदाच डिजिटल माध्यमांना इतक्या मोठ्याप्रमाणात महत्व देण्यात आले होते. चाहत्यांपर्यंत सर्वात जलद पोहोचणाऱ्या या डिजिटल माध्यमांसोबत अमृताने स्पेशल मीट अँड ग्रीटसाठी खास वेळ काढला.
काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटवर घेण्यात आलेल्या, अमृताच्या चित्रपटांमधील गाण्यांवर आधारित '#अल्टिमेटफेनऑफअमृता' या स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या स्पर्धकांना या पार्टीत बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे, या विजेत्यांची निवड खास अमृतानेच केली होती. 'मी जे काही आहे, ते केवळ माझ्या चाहत्यांमुळेच आहे. त्यांच्या अमाप प्रेमामुळे मी इथपर्यत पोहोचले आहे,  या शब्दांत तिने चाहत्यांचे आभार मानले. तसेच यापुढेदेखील अशीच साथ द्या, अशी विनंतीदेखील तिने या सर्वांना केली.