बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

अमृताने केला विशेष मुलांसोबत 'ख्रिसमस' साजरा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक असलेली अमृता खानविलकर, केवळ चाहत्यांमध्ये नव्हे तर लहान मुलांमध्येदेखील प्रसिद्ध आहे. अमृतादेखील वेळात वेळ काढत लहान मुलांमध्ये वावरताना अनेकवेळा दिसून आली आहे.

'सुपर डान्सर महाराष्ट्राचा' या रिएलिटी शॉच्या मुलांची तर ती लाडकी 'अम्मू दीदी' झाली आहे. अश्या ह्या सर्व बच्चेकंपनीच्या लाडक्या अम्मू दीदीने यंदाचा ख्रिसमस विशेष मुलांसोबत साजरा केला, ठाणे येथील जागृती पालक संस्थेच्या मतिमंद मुलांसोबत तिने काही क्षण निवांत घालवला, नाताळ सणाच्या निमित्ताने अमृताने त्यांच्यासाठी खास भेटवस्तूदेखील आणल्या होत्या. मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुटण्यासाठी तिने त्यांच्यासोबत मज्जा मस्ती करत, काही खेळदेखील खेळले. 
संस्थेच्या मुलांनी देखील तिला चांगला प्रतिसाद देत, तिच्या ख्रिसमस पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. तसेच, अमृताच्या स्वागतासाठी जागृती पालक संस्थेतील या विशेष मुलांचा खास नाचगाण्याचा कार्यक्रमदेखील तिथे आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, सामान्य मुलांप्रमाणे या मुलांकडून ही मिळालेल्या अमाप प्रेमामुळे तिला भरूनदेखील आले. 'मी दरवर्षी वेगवेगळ्या एनजीओमधील लहान मुलांना जाऊन भेटले आहे. त्यांचा सहवास मला आवडतो.  मात्र, इथे येऊन मी खरंच भरून पावले आहे. ही मुलं सामान्य मुलांसारखी नसली तरी खूप खास आहे, ही मुलं देखील निरागस आणि भोळीभाबडी आहेत, त्यामुळे यांना इतरांहून वेगळे असे म्हणताच येणार नाही. या मुलांकडून मला जे काही प्रेम मिळालं आहे, ते न विसरण्याजोगं आहे.' असे भावोद्गार तिने काढले.