गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 14 जानेवारी 2024 (13:21 IST)

आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये आर्ची-परश्या एकत्र!

rinku rajguru
social media
सध्या आमिर खानच्या मुलीचे आयरा खानच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ग्रँड रिसेप्शन मध्ये सिने सृष्टीतील मोठे कलाकारांनी उपस्थिती लावली. या समारोह मध्ये चित्रपट सैराटचे कलाकार आर्ची आणि परश्या म्हणजे रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी देखील हजेरी लावली. 
 
या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाश ने काळी शेरवानी घातली होती तर रिंकूने गुलाबी काठांची निळी साडी घातली होती. ती साडीत खूपच सुंदर दिसत होती.दोघांचाही पारंपरिक लूक यावेळी खुलून दिसत होता.ही जोडी एकत्र या सोहळ्यासाठी पोहोचल्याने काहींनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी ही बेस्ट जोडी असल्याच्याही कमेंट देखील दिले. 
 
रिंकू आणि आकाश ने एकत्र  माध्यमांना पोज दिल्या. या रिसेप्शन मध्ये हेमामालिनी, धर्मेंद्र, जॅकी श्रॉफ, रेखा, सायराबानो कतरीना कैफ, शाहरुख खान, सलमान खान, कार्तिक आर्यन, मुमताज, जया बच्चन सारख्या बड्या कलाकारांनी उपस्थिती दिली. 
 
आयरा खान आणि नुपूर शिखरे या दोघांचं मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार पडलं. आयरा आणि नुपूरचं रिसेप्शन मुंबईतील निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये  मोठ्या दिमाखात पार पडलं. या ग्रँड रिसेप्शनला सेलिब्रिटी, कलाकार, खेळाडू आणि नेते मंडळींसह दिग्गजांची उपस्थिती लागली. 
 
Edited By- Priya Dixit