बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (17:18 IST)

Big Boss Marathi: 'गंदी बात' फेम अभिनेत्री नीथा शेट्टी बिग बॉस मराठीतून बाहेर

वाईल्ड कार्डद्वारे एंट्री मिळालेल्या नीथा शेट्टी साळवी या बिग बॉस मराठी मधून बाहेर पडली आहे. काही दिवसांपूर्वी वाईल्ड कार्ड द्वारे घरात प्रवेश केलेल्या आदिश वैद्यलाही प्रेक्षकांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता.
 
रविवारी डेंजर झोनमध्ये असलेल्या सदस्यांमध्ये सोनाली, उत्कर्ष, विकास आणि नीथा यांची नावं होती. बाकी तीन जण सेफ झाले आणि नीथाला बाहेर पडावं लागलं.
हिंदी मालिकांमधील अदाकारीसाठी नीथा प्रसिद्ध आहेत. 'ढूंढ लेगी मंजिल हमें' या मालिकेतील नीथा यांनी साकारलेलं आरती हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.
एक दिन अचानक, घर की लक्ष्मी बेटी, परमावतार श्रीकृष्ण, प्यार की ये एक कहानी, ससुराल सिमर का, सियासत, एमटीव्ही बिग एफ या मालिकांमध्ये नीथाने काम केलं आहे.
मराठी चित्रपट 'फुगे' आणि 'तुला कळणार नाही' यामध्येही नीथा झळकली आहे.
 
'गंदी बात' 4 मालिकेतील बोल्ड दृश्यांमुळे नीथाच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. नीथाने गुंजा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. ही भूमिका कशी स्वीकारली असा प्रश्न चाहते विचारत असल्याचं नीथाने म्हटलं होतं.
बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी नीथाने सादर केलेलं नृत्यही चर्चेत राहिलं होतं.
 
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात 15 स्पर्धक होते. दर आठवड्याला एक स्पर्धक घराबाहेर पडतो. वाईल्ड कार्डद्वारे काहीजण घरात प्रवेश करतात. हे सर्वजण 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बिग बॉसच्या घरात असतील.
यंदाच्या हंगामात आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून कीर्तनकार शिवलीला आरोग्याच्या कारणास्तव बाहेर पडल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना गेल्या आठवड्यात बिग बॉसचं घर सोडावं लागलं.
 
अभिनेत्री आणि नृत्यांगना सुरेखा कुडची यांनीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली आहे. सुरेखा यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत बहुचर्चित 'मीना आत्या' ही त्यांची भूमिका गाजली होती.
युवा अभिनेता अक्षय वाघमारे यालाही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं. वाईल्ड कार्डद्वारे एंट्री मिळालेल्या आदिश वैद्यही घराबाहेर पडला आहे.
चित्रपट, नाटक, मालिका यामधून गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळ कार्यरत अभिनेता आविष्कार दारव्हेकरला बिग बॉसचं घर सोडावं लागलं. आविष्कार बाहेर पडल्यानंतरच दुसऱ्या वाईल्ड कार्डद्वारे नीथा यांना बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळाला होता.